साधारणतः आपल्या साऱ्या घरात आई-वडील-काका-मामांच्या तोंडी मुलांसाठी हेच वाक्य ऐकू येते. मुलींसाठी कोणती वाक्य असतात- ‘ही काय मुलींनी शिकायची गोष्ट आहे’ इत्यादी! काळानुसार यात खुपसा बदल झाला आहे. परंतु मुलांना ध्येय निश्चिती [Goal Setting ,Career Counselling ] – हे सर्व मार्गदर्शन करण्याऐवजी वरील वाक्यातून त्यांना एकदाचा उदरनिर्वाहाचा मार्ग सुरु करायला सांगितला जाते.
काही सुज्ञ पालक याला अपवाद आहेत. पणI बहुतांशी पालकांचे वरीलप्रमाणे होते – यातून मुले आवडीचे करिअर करू शकत नाहीत- व पुढे त्यांच्या क्षेत्रात अकार्यक्षम बनतात. अनेकदा निराशेतून, जीवनातल्या कर्तव्य शून्य मनस्थितीतून, फोलपणातून [ Emptyness, Non-Productiveness ] मग अयोग्य मार्गाला लागतात. ही वाट त्यांची न मिळालेल्या संधीतून एक बंडखोरी असते. यात पालक असमाधानी होतातच, ह्यात मुलांचेही अनमोल जीवन व्यर्थ होते.
मुलांच्या यशस्वी करिअरमध्ये पालकांची भूमिका
– तुमच्या मुलांवर तुमची करिअरची स्वप्ने लादु नका – अनेकदा अशी उदाहरणे दिसतात की वडिलांना वकील व्हायचे होते, ते होऊ शकले नाहीत म्हणून मुलाला त्याची इच्छा नसताना वकील केले जाते.वास्तविक मुलाला संगीतकार व्हायचे असते.
– मुलांना विचार स्वातंत्र्य द्या- अर्थात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे ही त्यांना सांगा. तथापि त्यांना वेगवेगळे करिअरचे पर्याय सुचवा- आपली आवड शोधू द्या, त्यांना विचार करू द्या. त्यांच्यावर विशिष्ट दिशेलाच जाण्याची जबरदस्ती करू नका. हे निश्चित की त्यांनी एक दिवस स्वावलंबी व्हायला हवे. परंतु ते होऊ द्या त्यांच्या आवडत्या करिअरमध्ये! .
– हे ध्यानात घ्या- त्यांची Genius ऊर्जा प्रचंड आहे– त्याच्या मेंदूत शिकण्याची खूप पात्रता आहे. त्यांना विचार स्वातंत्र्य, उत्तेजन, पाठबळ दिले तर त्यांच्यातील विशेष प्रतिभा – Genius जागृत होऊ शकते – प्रतीत होऊ शकते. अशा व्यक्ती जन्मतःच तशा नसतात- त्या घडतात.
एडिसनच्या शिक्षकांनी सांगितले हा मुलगा काही शिकू शकणार नाही – स्वप्नाळू आहे , नादिष्ट आहे. त्याच्या आईने त्याच्यातील चौकस बुद्धी ओळखली व त्यास उत्तेजन दिले. त्याने बल्ब, ग्रामोफोन सहित ११०० शोध लावले. आईन्स्टाईन हा लहानपणी मंदबुद्धी समजला जायचा -पण तो सखोल विचार करायचा -हाच मुलगा पुढे शतकातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ झाला.
बुर्ज खलिफा हि जगातील सर्वात उंच डिझाईन करणारा आर्किटेक्ट लहानपणापासून स्वप्नाळू होता -चित्रकार होता -तो शाळेत असताना नेहमी अनेक मजली उंच इमारतीची स्केचेस करायचा.
मुलांनी स्वप्नाळू असणे, एकलकोंडे असणे हा दुर्गुण नाही – जगात विंडोजचा जनक बिल गेट्स, अँपल कॉम्पुटरचा स्टिव्ह जॉब्स , जुरासिक पार्क चित्रपटाचा दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग , अमिताभ बच्चन , बुकर प्राईझ विजेती कथालेखिका झुम्पा लाहिरी , प्रसिद्ध चित्रकार रझा , सिटीबँकचा पूर्वीचा प्रमुख विक्रम पंडित, जगप्रसिद्ध ग्राफिक डिझाइनर पॉल रँड, पेप्सीची प्रमुख इंद्र नुयी हे सारे शालेय जीवनात स्वप्नाळू होते , व पुढेही हीच प्रणाली त्यांना उपयोगी पडली -व त्यांच्याकडून अशक्य वाटेल अशी प्रचंड निर्मिती घडली
या गुणामागे एक सुप्त गुण आहे- कल्पनाशक्ती ! या गुणातूनच अनेक व्यक्तींनी सृजनात्मक , प्रचंड निर्मिती केली आहे . हा गुण कमीअधिक प्रत्येक मुलांत असतो. त्यांना शेखचिल्ली नावाने संबोधू नका – त्यांच्यातील हा गुण अप्रत्यक्षपणे दाबू नका. असेही होऊ शकते की तुमच्याच घरात एक बिल गेट्स किंवा इंद्रा नुयी वाढते आहे- त्यांना उत्तेजन द्या. उत्तेजनाचे सामर्थ्य मोठे आहे
Dmit – Dermato Glyphic Multipal Intelligence Test- करिअर समुदेशन
यासाठी मुलं करिअर कॉऊन्सलरकडे न्या- त्यांचा सल्ला घ्या. यासाठी, मुलांची आवड, करिअरकडे त्यांचा कल ओळखण्यासाठी Dmit – Dermato Glyphic Multipal Intelligence Test करणे आवश्यक आहे. यामध्ये मुलांच्या बोटांच्या ठशावरून त्यांच्या अंतर्मनातील आवड व कल शोधात येतो व करिअर ठरवता येते.
त्यांचे यशस्वी करिअर ‘Dmit Counselling in Pune ‘ ही प्रतिथयश संस्था हे काम मौलिक कार्यप्रणाली वापरून करीत आहे . प्रत्येक मुलामध्ये ९ प्रकारची बुद्धिमत्ता असते. काहीमध्ये विशिष्ट बुद्धिमत्ता जास्त असते, काहीमध्ये कमी प्रखर असते . त्यात संगीत, गणित, भाषा, प्रभावी संभाषण , डिझाईन ,रचनाकौशल्य असे प्रकार आहेत. समुदेशनाने , विश्लेषणाने हे ओळखता येते व मार्गदर्शन केले जाते
आज या टेस्टने , कौन्सलिंगने अनेक विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडत आहे व पालकांनाही समाधान लाभले आहे .
अधिक माहितीसाठी आजच आमच्या संकेतस्थळाला भेट द्या व आपले नाव नोंदवा-आम्हाला भेटा.
तुमच्या मुलाचे उज्ज्वल भविष्य तुमच्या आजच्या निर्णयावर आहे.
0 Comments
Leave a comment